Home धर्म-समाज रावेर पंचायत समितीत भजनी मंडळांना साहित्य वाटप

रावेर पंचायत समितीत भजनी मंडळांना साहित्य वाटप

0
47

रावेर, प्रतिनिधी  । रावेर पंचायत समितीत तालुक्याती पाच गावांमधील भजनी मंडळांना जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.

 

जिल्हा परिषदच्या समाज कल्याणच्या मागासवर्गीय विभागामार्फत २० टक्के निधीतुन तालुक्यातील सहा भजनी मंडळ मोरगांव, के-हाळा बु, चिनावल, वाघोदा, खिरवड येथे साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये टाळ,मृदुंग,पेटीसह भजनासाठी लागणारे इतर साहित्य पंचायत समितीत वाटप करण्यात आले. यावेळी पंचयात समिती सभापती कविता कोळी, पंचायत समिती  सदस्य दिपक पाटील, जुम्मा तडवी, योगिता वानखेडे, गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल,प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी डी. एस. सोनवणे यांनी केले.

 


Protected Content

Play sound