Home Cities चाळीसगाव सेवानगर येथे वृक्षारोपण करून नाईक यांची जयंती साजरी

सेवानगर येथे वृक्षारोपण करून नाईक यांची जयंती साजरी

0
36

चाळीसगाव प्रतिनिधी । हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या १०८ व्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील सेवानगर येथे वृक्षारोपण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती १ जूलै रोजी देशभरात जल्लोषात साजरी करण्यात येते. मात्र कोरानाचा संक्रमण सुरू असल्याने गेल्या दिड वर्षांपासून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील सेवानगर येथे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान १ जूलै रोजी कृषीदिवस असल्याने यावेळी वडाचे रोप लावून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी अमोल चव्हाण हे होते. त्यांनी यावेळी वसंतराव नाईक यांच्या कार्याची इत्यंभूत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानगर ग्रा.पं. सदस्य सुनिल राठोड यांनी केले असून यावेळी त्यांनी रोजगार योजनेविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमाप्रसंगी माजी सरपंच पुंडलिक राठोड, माजी उपसरपंच बाबू काळू, ग्रामरोजगार सेवक साईनाथ चव्हाण, सुभाष राठोड, वाल्मिक राठोड, बळीराम चव्हाण, सजन चव्हाण, अरुण चव्हाण, विजय राठोड,दत्तू जाधव, निळकंठ मगर व मोठ्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound