Home Cities यावल यावल रूग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रूग्णांना अन्नदान व फळवाटप

यावल रूग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रूग्णांना अन्नदान व फळवाटप


यावल प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून राष्ट्रवादी तालुका कार्यकारिणीच्या वतीने यावल ग्रामीण रूग्णालयात अन्नदान व फळवाटप आज बुधवारी सकाळी करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाच्या वतीने आज ग्रामीण रूग्णालयात गरीब व गरजू रूग्णांना फळवाटप करण्यात आले. सकाळी ११ वाजता येथील शिवभोजन केंद्रात  गरजूंना अन्नदान करण्यात आले. तर दुपारी १२ वाजता फैजपूरातील खाचणे रूग्णालयात रूग्णांना फळवाटप करण्यात आले. 

याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, सामाजीक व न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष एस .पी .बोदडे, जिल्हा सरचिटणीस विजय पाटील, नगरसेवक राकेश कोलते , युवक तालुकाध्यक्ष अॅड देवकांत पाटील, महीला आघाडीच्या व्दारका पाटील, शामल भावसार, युवक शहराध्यक्ष हितेश गजरे, भैय्या पाटील, अब्दुल सईद, कामराज घारू, अरूण लोखंडे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष निवृत्ती धांडे, बापु जासुद, फैजपुरचे नगरसेवक शेख कुरबान शेख करीम, नवाब मलिक विचार मंच जिल्हा कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी अन्वर खाटीक , नगरसेवक रशीद तडवी   यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound