Home Cities पाचोरा रेल्वे भुयारी मार्ग तात्काळ सुरू करा; भातखंडे खुर्द येथील नागरीकांची मागणी

रेल्वे भुयारी मार्ग तात्काळ सुरू करा; भातखंडे खुर्द येथील नागरीकांची मागणी


पाचोरा प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या भातखंडे खुर्द येथील रेल्वे फाटक बंद असल्यामुळे नागरीकांचे अतोनाथ हाल होत आहे. तयार होत असलेला रेल्वे भुयारी मार्ग तत्काळ सुरू करा अशी मागणी नागरीकांनी केली.

पाचोरा हे बाजारपेठेचे ठिकाण असुन खेड्यापाड्यातुन नागरीक बाजार, अत्यावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी येत असतात. मात्र वडगाव टेक रेल्वे फाटक बंद करून त्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आलेला आहे. सदर भुयारी मार्ग सुरू नसल्याने नागरीकांचे हाल होत आहे. भुयारी मार्ग तात्काळ सुरू करावे, असी मागणी भातखंडे खुर्द ग्रामपंचायत सरपंच दिनेश जगतराव पाटील यांच्यासह ग्रामस्थांकडून होत आहे. सदर भुयारी मार्ग संबंधित अधिकारी, ठेकेदार यांनी गांभीर्य ओळखत भुयारी मार्ग सुरू करावे. पाचोरा येथे येजा करण्याकरीता पर्यायी मार्ग म्हणुन रेल्वे पुलाखालुन वापरतात मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाळ्याचे पाणी साचल्यामुळे नागरीकांचे हाल होत आहे. सदर भुयारी मार्ग लवकरात लवकर सुरू करावे. व नागरीकांची समस्या सोडण्यात यावी.


Protected Content

Play sound