Home Cities जळगाव दिलासादायक : जिल्ह्यात आज ३५ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले; १०१ रूग्ण झाले...

दिलासादायक : जिल्ह्यात आज ३५ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले; १०१ रूग्ण झाले बरे !


जळगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात येत आहे. जिल्हा कोवीड रूग्णालयात आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरातून ३५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १०१ रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. 

आजची तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर-४, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-२, अमळनेर-०, चोपडा-२, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-२, जामनेर-२, रावेर-१, पारोळा-२, चाळीसगाव-१४, मुक्ताईनगर-१ असे एकुण ३५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या अहवालानुसार आजपर्यंत १ लाख ४२ हजार १८६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३८ हजार ८१४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ८०२ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.  अशी माहिती जिल्हाशल्यचिकित्स डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 


Protected Content

Play sound