पाचोऱ्यात ओ.बी.सी. आरक्षणासाठी कॉँग्रेसचे भाजपा विरोधात आंदोलन (व्हिडिओ)

पाचोरा, प्रतिनिधी ।  देशाला आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाचोरा काँग्रेसने ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन केले.

 

देशातील लोकांना आरक्षणाची गरज असून सर्व प्रथम आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज यांच्या जंयतीचे औचित्य साधून  पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओ.बी.सी. आणि मराठा बांधवांची फसवणूक करुन देशात हुकुमशाही आणू पहाणार्‍या  भाजपा मोदी सरकार विरोधात कॉंग्रेसकडून निदर्शने करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निदर्शने करण्यात आली.  कॉँग्रेसच्या घोषणांनी चौक दणाणले होते. यात आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, मोदी तेरी तानाशाही नही चलेगी नही चलेगी, नही चाहीए सोना चांदी, हमें चाहीए राहुल गांधी, ओ.बी.सी. सह मराठा समाजाला फसविणाऱ्या भाजपा सरकार चा निषेध असो अशा घोषणांचा समावेश होता. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जेष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, किशोर गरुड, गणेश गायकवाड, महीला तालुका अध्यक्षा अॅड. मनिषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, सरचिटणीस कुसुम पाटील, क्रांती पाटील, रेखा पाटील युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, शिवराम पाटील, इस्माईल तांबोळी, संजय सोनार, दिपक सोनवणे, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. कॉग्रेसच्या आजच्या निदर्शनाची चर्चा शहरात सुरू होती.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/4014537935291774

 

Protected Content