Home Cities जळगाव माजी जि.प. सभापती बळीरामदादा सोनवणे कालवश

माजी जि.प. सभापती बळीरामदादा सोनवणे कालवश

0
154

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा जळगाव बाजार समितीचे माजी सभापती बळीरामदादा सोनवणे यांच्या आज सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बळीरामदादा सोनवणे (वय ८५) हे जळगाव तालुक्यासह सहकार क्षेत्रातील एक मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. आज सायंकाळी त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. ते माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे वडील; आमदार लताताई सोनवणे व माजी महापौर राखीताई सोनवणे यांचे सासरे होत. त्यांच्या पश्‍चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

बळीरामदादा सोनवणे यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक मोठे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत असून सर्व स्तरांमधून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound