जळगाव निखील वाणी । पोलीस भरतीतील ८०० उमेदवारांची निवड होवूनही तीन वर्षांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे. या सर्व उमेदवारांना तत्काळ सेवेत घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उमेदवारांनी केला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०१८ मध्ये झालेल्या पोलीस भरतीत सुमारे ८०० उमेदवारांची निवड करण्यात आली होती. निवड झाल्यानंतर भरती प्रक्रिया संदर्भातील कागदपत्र तपासणी करण्यापर्यंची प्रक्रिया देखील पुर्ण करण्यात आली आहे. परंतू गेल्या तीन वर्षांपासून अद्यापपर्यंत सर्व उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. उमेदवारांना नियुक्त देण्यात यावी याबाबत शासनाकडे पाठपुराव करत आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह २५० आमदार व खासदार यांना निवेदन देण्यात आले आहे. परंतू पोलीस प्रशासनाकडून कोणताही पाठिंबा मिळत नसल्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. प्रतिक्षा यातील सर्व उमेदवारांना तातडीने नियुक्त करण्यात यावे यासाठी आज निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर डिगंबर महाजन, यश पाटील, हेमराज सपकाळे, प्रवीण पाटील, अक्षय बाविस्कर, विकास पाटील, हेमराज गायकवाड, महेश जाधव, प्रमोद पाटील, योगेश पाटील, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.