Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात 35 रूग्ण बाधित आढळले; 159 रूग्ण झाले बरे...

कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात 35 रूग्ण बाधित आढळले; 159 रूग्ण झाले बरे !


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात दिवसभरात 35 रूग्ण आढळून आले आहे. तर 159 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

जळगाव शहर-2, जळगाव ग्रामीण-4, भुसावळ-3, अमळनेर-2, चोपडा-1, पाचोरा-1, भडगाव-0, धरणगाव-4, यावल-2, एरंडोल-2, जामनेर-4, रावेर-2, पारोळा-4, चाळीसगाव-3, मुक्ताईनगर-1, बोदवड-0 असे 35 बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 1 लाख 42 हजार 107 बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 1 लाख 38 हजार 571 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर 967 रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 


Protected Content

Play sound