Home Cities पाचोरा पाचोरा येथील गो.से. हायस्कूलला आमदारांनी दिले प्रिंटर

पाचोरा येथील गो.से. हायस्कूलला आमदारांनी दिले प्रिंटर


पाचोरा, प्रतिनिधी । नाशिक विभागाचे शिक्षक आ. किशोर दराडे यांनी आमदार निधीतून पाचोरा तालुक्यातील दहा तर भडगाव तालुक्यातील सहा शाळांना सुमारे अठरा हजार रुपये किंमतीचे प्रिंटर उपलब्ध करून दिले आहे.

येथील गो. से. हायस्कूलमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हे प्रिंटर शाळांना उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन विलास जोशी होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात गो. से. हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, सुमनताई पाटील माध्यमिक विद्यालय भडगावचे मुख्याध्यापक विश्वासराव साळुंखे, जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वाणी यांनी मान्यवरांच्या हस्ते प्रिंटर स्वीकारले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोर दराडे यांचे प्रतिनिधी व मुख्याध्यापक अरुण पैठणकर, आकाश संजय वाघ, व्ही. आर. धातरट, ओ. व्ही. वन्से उपस्थित होते. तर व्यासपीठावर मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील, ए. बी. अहिरे, कार्यालय लिपिक अजय सिनकर सह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले.


Protected Content

Play sound