अपघातग्रस्ताला रोहिणी खडसे यांची मदत

 

मुक्ताईनगर : प्रतिनिधी । अपघातानंतर रस्त्यावर जखमी होऊन पडलेल्या तरुणाला जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांनी मदत करीत रुग्णवाहिकेउन भुसावळला रुग्णालयात पाठवले 

 

राष्ट्रीय महामार्ग क्र 6 तरसोद ते मुक्ताईनगर दरम्यान चौपदरीकरण झाले असुन नविन रस्त्यावरून वाहनधारक भरधाव वेगाने वाहने चालवत असतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असुन दररोज छोटे मोठे अपघात होत असल्याचे दिसून येत आहे

आज  मुक्ताईनगर येथील त्रिशुल  मराठे हा युवक भुसावळवरून मुक्ताईनगर येथे दुचाकीवरून येत असताना बोहर्डी फाटा येथील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन पडला होता

यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर त्या मार्गाने जात असताना त्यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी लगेच मुक्ताईनगर येथून रुग्णवाहिका बोलावून विकी मराठे यांना पुढील उपाचारासाठी भुसावळ येथे रुग्णालयात रवाना केले

यावेळी पं स माजी सभापती राजेंद्र माळी, शिवराज पाटील व बोहर्डी ग्रामस्थांनी मदत केली

Protected Content