जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथून ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी आज अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शक्तिसींग खेतसिंग शेखावत (वय-३२) रा. गोरीया ता. दातारामगढ जि. शिकर (राजस्थान) ह.मु. रामेदववाडी ता.जि.जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, शांताराम मिठाराम बागुल (वय-४८) रा. वाकडी ता.जि.जळगाव शेतकरी आहे. कामाच्या निमित्ताने ते (एमएच १९ डीएच ७६१३) दुचाकी वापरतात. ५ जून रोजी सायंकाळी ते तालुक्यातील म्हसावद येथे कामाच्या निमित्ताने आले होते. त्याची त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी शांताराम बागुल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाधिकारी यांनी संशयित आरोपी शक्तिसींग खेतसिंग शेखावत (वय-३२) रा. गोरीया ता. दातारामगढ जि. शिकर (राजस्थान) ह.मु. रामेदववाडी ता.जि.जळगाव याला म्हसावद येथून आज दुचाकीसह अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, मिलिंद सोनवणे, गणेश शिरसाळे, शशिकांत पाटील, स्वप्नील पाटील, योगेश बारी यांनी कारवाई केली. संशयित आरोपीच्या ताब्यातून चोरी दुचाकी हस्तगत केली आहे.