Home आरोग्य वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंकडून ४ बाय पॅप मशीन भेट

वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंकडून ४ बाय पॅप मशीन भेट

0
53


मुक्ताईनगर प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तसेच युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या वतीने चार बाय पॅप ( BI-Pap) मशीन ट्रॉली सहित भेट स्वरूपात दिले आहे. यांचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे, डॉ. नम्रता अच्छा, शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, शहरप्रमुख गणेश टोंगे, गटनेता राजू हिवराळे, युवासेना तालुका प्रमुख पंकज राणे, हरी माळी यांच्यासह रुग्णालयाचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound