अमळनेर (प्रतिनिधी) आज रविवारी जागतिक आरोग्य दिनानिमित्त येथील साई सेवा हॉस्पिटलच्यावतीने तालुक्यातील पातोंडा येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. साई सेवा हॉस्पिटलच्या कान ,नाक ,घसा तज्ञ डॉ. प्रियंका शिंदे यांनी यावेळी सुमारे ७५ रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करून औषध उपचार केले. त्यांना साई सेवा हॉस्पिटल परिवारातील डॉ. विरहान पाटील, डॉ. उदय कुमार खैरनार, सागर पाटील, अक्षय चौधरी, राहुल पाटील, पुंडलिक पाटील यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
डॉ. शिंदे यांनी उपस्थित ग्रामस्थांना आरोग्य विषयावर मार्गदर्शन केले. चे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी पातोंडा गावातील विलास चव्हाण, महेंद्र पाटील, राजन पाटील, सागर मोरे, दिनेश बिरारी, राकेश पाटील, घनश्याम पाटील व ग्रामस्थ मंडळ यांनी सहकार्य केले. पातोंडे परिसर विकास मंचच्या वतीने डॉ. शिंदे व सहकारी यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.