जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पळासखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजूर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, परराज्य महिला आपल्या कुटुंबियासह तालुक्यातील मोहाडी येथे मोलमजूरी करण्यासाठी आलेल्या आहे. तालुक्यातील पळासखेडा शिवारात ९ जून रोजी विवाहिता घरात एकटी असतांना रात्री ९ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी विनोद मदन पवार रा. मोरगाव तांडा ता. जामनेर हा आला. विवाहितेचा हा पकडून तिच्याशी जबरदस्ती करू लागला. तिला मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. महिलेने आरोड्या मारल्यानंतर अजूबाजूला राहणारे नागरीक घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांना पाहून विनोद पवार तेथून पसार झाला. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात विनोद पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास चव्हाण करीत आहे.