जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ग्राम शिक्षण समित्या, वार्ड प्रभाग समित्या स्थापन व सक्रिय करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी रावेर, एरंडोल व पारोळा तालुक्याच्या शिक्षण समन्वय समित्या गठीत केल्या असून तसे आदेश निर्गमित केले आहे.
त्यानुसार रावेर तालुका समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार शिरीष चौधरी यांची नेमणूक केली आहे. तर पंचायत समीतीचे सभापती पदसिध्द सदस्य असतील. इतर सदस्यांत सेवाभावी शिक्षण संस्थेचे दोन प्रतिनिधी म्हणून प्रशांत रामभाऊ चौधरी, रा. खिरोदा. किरण निंबा नेमाडे, रा. चिनावल, ग्राम शिक्षण समित्यांचे तीन अध्यक्ष म्हणून रविंद्र राजाराम पवार, रा.रावेर, दिलीप शालीक पाटील, रा.अजंदा. श्रीमती प्रतिभा मोरे, रा.मस्कावद. अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी म्हणून सुभाष सिताराम गाढे, रा.विवरा, मुबारक उखर्डू तडवी, रा.कुसुंबा. पालक शिक्षक संघाचे तीन प्रतिनिधी म्हणून सुनिल पंडीत लासुरे, रा. भाटखेडा, रविंद्र साहेबराव पाटील, रा. दोधे, राहुल आनंदा पाटील, रा. भामलवाडी. प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य म्हणून सुधाकर चांगदेव झोपे, रा. खिरोदा, जे. के. पाटील, रा. खिरवड. तालुका वैद्यकीय अधिकारी हे सदस्य म्हणून राहतील. तर तालुक्याचे तहसिलदार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक किंवा अनुभवी व सेवानिवृत्त शिक्षक, गटशिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी हे पदसिध्द सदस्य म्हणून यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पारोळा तालुका समितीचे अध्यक्ष म्हणून विधानसभा सदस्य चिमणराव रुपचंद पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. पदसिध्द सदस्य म्हणून पंचायत समीतीच्या सभापती श्रीमती रेखाताई देविदास भिल तर इतर सदस्यांत सेवाभावी शिक्षण संस्थेचे दोन प्रतिनिधी म्हणून दिपक वसंतराव पाटील, रा.मंगरुळ, उत्तम निंबा पाटील, रा.उंदीरखेडे. ग्राम शिक्षण समित्यांचे तीन अध्यक्ष म्हणून विनोद सर्जेराव पाटील, रा. टोळी, सुभाष रमेश पाटील, रा.भोंडणदिगर, श्रीमती मंदाबाई सुकदेव पाटील, रा.कन्हेरे. अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी म्हणून अमोल संजय सोनवणे, रा. पारोळा, मिलींद शिवाजी सरदार, रा. पारोळा. पालक शिक्षक संघाचे तीन प्रतिनिधी म्हणून नंदकिशोर सांडू पाटील, रा. विटनेर, भैय्या रामलाल पाटील, रा. पिंप्री, समाधान दगडू पाटील, रा. सांगवी. प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य म्हणून गोविंद विठ्ठल टोळकर, रा. पारोळा, मधुकर पंडीत शिवदे, रा.बहादरपूर. तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ. प्रांजली सुभाष पाटील हे सदस्य म्हणून तर पारोळ्याचे तहसिलदार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प हे पदसिध्द सदस्य, राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक किंवा अनुभवी व सेवानिवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसर, रा.पारोळा हे सदस्य तर गटशिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी यांची पदसिध्द सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
एरंडोल तालुका समितीचे अध्यक्ष म्हणून विधानसभा सदस्य चिमणराव रुपचंद पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. पदसिध्द सदस्य म्हणून पंचायत समीतीच्या सभापती श्रीमती शांताबाई प्रभाकर पाटील तर इतर सदस्यांत सेवाभावी शिक्षण संस्थेचे दोन प्रतिनिधी म्हणून दिपक प्रभाकर महाजन, रा. उत्राण, आधार नारायण पाटील, रा. रिंगणगाव. ग्राम शिक्षण समित्यांचे तीन अध्यक्ष म्हणून शरद तुळशिराम बडगुजर, रा. कढोली, सचिन दंगल पाटील, रा. पिंपळकोठा, भारत श्रावण राठोड, रा.आनंदनगर. अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी म्हणून मनोहर कृष्णा खेडकर, रा. उत्राण, रविंद्र चिंतामण लांडगे, रा.जवखेडेसिम. पालक शिक्षक संघाचे तीन प्रतिनिधी म्हणून प्रशांत सुभाष पाटील, रा. हनुमंतखेडेसिम, भास्कर दिनकर शिंदे, रा. सावदा, संजय मुरलीधर मराठे, रा. हवरखेडी. प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य म्हणून राजेंद्र त्रंबक पाटील, रा. खडकेसिम, संदिप प्रभाकर महाजन, रा. निपाणे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज अहमद शेख हे सदस्य तर पदसिध्द सदस्य म्हणून एरंडोल तालुक्याचे तहसिलदार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प हे राहणर असून सदस्य म्हणून राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक किंवा अनुभवी व सेवानिवृत्त शिक्षक सुनिल पिंताबर पाटील, रा.खेडी खु. तर गटशिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी यांची पदसिध्द सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.