भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव येथे जुन्या वादातून एका तरूणाचा खून करण्यात आला असून पोलीसांनी यात चौघा संशयितांना अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील आंबेडकर नगर मध्ये रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जुन्या वादाची कुरापत काढून येथील रहिवाशी सचिन युवराज मगरे ( २८ ) असलेल्या तरुणास चौघानी धारदार शस्त्राने वार वरून खुन केल्याची घटना सोमवारच्या रात्री घडली आहे.
शहरातील डॉ बाबासाहेब आबेडकर पुतळ्या जवळील महालक्ष्मी सॉमील च्या समोर ही घटना घडली असुन पोलीसांनी या प्रकरणी चौघा संशयितांना अटक केली आहे. या खुनामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून याला जुन्या वादाची किनार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मयत व आरोपींमध्ये मध्यंतरी वाद झाला होता. हा वाद मिटला असला तरी काल रात्री यातूनच सचिन मगरे याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.