जळगाव प्रतिनिधी । अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून सोबत असलेला एक जण जखमी झाल्याची घटना बांभोरी बसस्थानकासमोर घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शाहिद शकिल बागवान (वय-२२) रा. टिपू सुलतान नगर, तांबापूरा जळगाव हा आपल्या आईवडील आणि तीन बहिणींसोबत राहतो. शहरातील आंबे विक्री व किरकोळ व्यापारीचे काम करायचा, त्यांचे वडील त्याला थोडेफार हातभार लावत होते. रविवारी ६ जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मित्रासह दुचाकीने पाळधी येथे वसुलीसाठी निघाले. दरम्यान बांभोरी गावाजवळी बसस्थानकाजवळून जात असतांन अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात शाहिद बागवान हा जागीच ठार झाला तर सोबत असलेला मित्र हा जखमी झाला आहे. जखमी शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शाहिदचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. आज सोमवारी ७ जून रोजी सकाळी ९ वाजता शवविच्छेदन करण्यात आला असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास मनोज इंद्रेकर करीत आहे.