मुक्ताईनगर पंकज कपले । छत्रपती शिवराज्याभिषेक दिन व केंद्रामध्ये मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून तालुक्यातील घोडसगाव येथे भाजपातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
अधिक माहिती अशी की, भारतीय जनता पार्टी व ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जामनेर तर्फे आज डोळे तपासणी, हाडे तपासणी , डोळ्यांचे चष्मे, औषध, वाटप मोफत करण्यात आले. यावेळी गंभीर रुग्णांची ऑपरेशन जामनेर येथे मोफत होणार आहे, तपासणी डॉ. राजेश नाईक, डॉ.सागर पोद्दार, डॉ.प्रताप पाटील, डॉ.गणेश सावळे, डॉ. हंसराज जाधव ,शिवाजी शिंदे, किरण मराठे, विनायक भामरे, मनोज जंजाळ, मयुर पाटील यांनी तपासणी केली.
आरोग्य शिबिर ठिकाणी रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, पं.स.सदस्य राजेंद्र सावळे, मुक्ताईनगर भाजप तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, घोडसगाव सरपंच प्रतिभा कोल्हे, ग्रा.पं.सदस्य बबिता कपले, अर्जुन सांगळकर, संजय पटेल, अनिल पटेल, पुंडलिक पाटील, समाधान पिवळतकर, गोपाळ सोनवणे, सचिन पाटील, सतीश वाघ, प्रदीप कोल्हे, गणेश मराठे, निखिल कपले, गणेश इंगळे, व्ही.आर.पाटील, रवींद्र देशमुख, प्रशांत दुत्ते यांची उपस्थिती होती.