Home क्राईम भुसावळातून दुचाकी चोरट्यास अटक; एलसीबीची कारवाई

भुसावळातून दुचाकी चोरट्यास अटक; एलसीबीची कारवाई

0
50


भुसावळ प्रतिनिधी । शहरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजार पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात भाग-५, गुरनं ४६८/२०१९ अन्वये दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी शेख इरफान शेख बशीर रा. नसर वंजी फाईल, भुसावळ याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी रात्री अटक केली. त्याने नसरवजी फाईल येथून चोरी केलेली दुचाकीची कबुली दिली आहे. संशयित आरोपी शेख इरफान शेख बशीर याला पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई सहाय्यक फौजदार अशोक महाजन, शरीफ काझी, पो.ना. युनुस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव यांनी कारवाई केली.


Protected Content

Play sound