जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवी पेठेतील बँक बडोदा आणि बेंडाळे चौक दरम्यान एकाच्या पिशवीतून २५ हजाराची रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, अशोक सांडू काळे रा. विवेकानंद नगर, केमिस्ट भवन जळगाव हे कामाच्या निमित्ताने नवीपेठेतील बँक ऑफ बडोदा येथे १ जून रोजी दुपारी १ वाजता आले. काम ओटापून घरी जात असतांना बँक ऑफ बडोदा ते बेंडाळे चौक दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून २५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याचे उघडकीला आले. त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता काहीही माहिती मिळाली नाही. अशोक काळे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर निकुंभ करीत आहे.