धरणगाव (प्रतिनिधी) सालाबादा प्रमाणे ह्या वर्षी ही येथील श्री बालाजी रथ वाहनोत्सव मंडळाच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवाचा नव वर्षाच्या निमित्ताने गाव गुढी उभारून नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अंजलीताई विसावे व भानुदास आप्पा विसावे याचा हस्ते व मंडळाचे अध्यक्ष डी.आर.पाटील व पदाधिकारी याचा समवेत विधीव्रत पुजन करून शोभा मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी ट्रॅक्टरवर भगवान श्री रामांची प्रतिमा व घोडेस्वारसह बॅडपथकाचा साह्याने वाजत गाजत मिरवणुकीस सुरवात करण्यात आली. सदर मिरवणुक श्री बालाजी मंदीर पासुन धरणीचौक, कोट बाजार, परीहार चौकातुन पिल्लु मज्जीत, घास बाजार, मराठे गल्ली, वाणी गल्लीतुन मंदीरा जवळ आरती होऊन समारोप करण्यात आला. भगवान श्री रामाचा जयघोष करत रसत्यावर म.ज्योतिबा फुले, लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येऊन ठिकठिकाणी प्रत्येक घरचा अंगणात रांगोळी काढुन शोभा मिरवणुकीचे पुष्पवृष्ठीने स्वागत करण्यात आले. मिरवणुकीचा समारोप प्रसंगी मंडळाचे सदस्य डी.आर.महाजन यांनी प्रास्ताविकात मंडळाने परंपरागत राबविलेल्या या वर्षप्रतिपदेच्या धार्मिक व पारंपारिक उत्सवाची माहीती सांगीतली. यावेळी सहसचिव प्रशांत वाणी यांनी आभार मानले. तर पोलीस प्रशासनाचा वतीने पोलीस निरीक्षक श्री. मोरे साहेब व सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी. आर. पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, सचिव राजेद्र पवार,प्रशांत वाणी अशोक येवले, किरण वाणी असंख्य सभासद व समाज बांधव सहभागी होते.