जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुना खेडी रोड परिसरातील शंकरराव नगरात महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी करून येथील नागरीकांशी संवाद साधला. यावेळी युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जुना खेडी रोड परिसरातील शंकरराव नगरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी गटारींच्या समस्या व रोडवरील अडचणी युवासेना विभाग प्रमुख मिलींद शेटे, युवा सेनेचे अमोल मोरे यांनी समस्या मांडल्या. यावर महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कूलभूषण पाटील यांनी लवकरच समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी अक्षय भिरुड, नितीन कुवर, तेजस आस्वार, मयूर पाटील, आकाश भोळे, पंकज सोनार, युवराज चौधरी, राकेश पाटील आदी उपस्थित होते.