खामगाव प्रतिनिधी । वीज कामगार, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जासह इतर मागण्यांसाठी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाला आज ५ दिवस होऊन अद्याप मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्याने आजपासून कृती समितीने कार्यालयीन व्हाट्सअप ग्रुप मध्ये लेफ्ट होत, आंदोलन तीव्र केले आहे. असे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन सबोंडीनेट इंजिनीअर्स असोसिएशन विदयुत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियन, बीएमएस, महाराष्ट्र राज्य विज कामगार कांग्रेस. (इंटक) हाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार यूनियनच्या वतीन ऐका प्रसि्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील १६ कोटी जनता व २ कोटी ८८ लक्ष वीज ग्राहक यांना गेल्या दि. २३ मार्च २०२० पासून लाकडाऊन सुरू झाला व देशभर आणि राज्यभर कोव्हिड १९ आजाराचा भयंकर प्रकोप सुरू असताना व राज्यातील रस्ते निमनुष्य असताना राज्यातील ८६,००० वीज कामगार, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार २४ तास अविरत वीज निर्मिती, वहन व वितरणाचे काम दिवस रात्र करत आहेत. त्यामुळेच राज्यातील सामान्य जनता घरात राहू शकत आहे. वीज पुरवटा अविरत सुरू असल्यामुळे दवाखाने, कोव्हिड हॉस्पिटल, पाणी पुरवठा, दिवाबत्ती इत्यादी ठिकाणी वीज सुरळीत आहे. मागील वर्षी झालेले फयान चक्रीवादळ व या वर्षी झालेले ताक्ते चक्रीवादळ व कोल्हापूर, सांगली पंढरपूर मध्ये झालेले महापुरात तसेच मुंबईतील तांत्रिक कारणाने ग्रीड फेल झाल्यानंतर विक्रमी वेळेत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम कामगार व अभियंते यांनी केले.
अत्यंत महत्वाचे वीज उधोगात काम करणाऱ्या वीज कामगार, अभियंते, अधिकारी तसेच कंत्राटी कामगार यांना गेले वर्षभर फ्रंटलाईन वर्कर चा दर्जा देवुन शासनाप्रमाणे सुविधा द्यावे. फ्रंटलाईन वर्कर समजून वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार, सर्व सहाय्यक, वीज सेवक व प्रशिक्षणार्थी याचे व त्याच्या कुटूंबातील सदस्यांचे प्रथम लसीकरण करावे. कोव्हिड १९ मुळे मृत्यू पावलेल्या वीज कामगारांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे रू. ५० लाख अनुदान द्यावे, तिनही कंपन्याकरिता एम. डी. इंडिया या जुन्याच टिपीए ची तात्काळ नेमणूक करावी, कोव्हिड १९ आजाराचा महाराष्ट्रात उद्रेक पाहता वीजबिल वसुली करिता शक्ती करू नये, ह्या मागण्या साठी शासन व प्रशासनाकडे वारंवार निवेदन /मागणी करून सुधा शासन व प्रशासन यांनी मागणी मान्य न केल्याने दि २४. मे रोजी बेमुदत कामबंद आंदोलन कोणत्याही ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही झाला तरी तात्काळ दुरूस्त करण्याची दक्षता घेवून सहा संघटनांच्या कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रभर सुरू केलेले आहे.
दि. २४. मे रोजी . डॉ. नितीन राऊत ऊर्जामंत्री व तिनही कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या समवेत सहा कामगार संघटना पदाधिकारी यांनी चर्चा झाली, चर्चेत वीज कामगार, अभियंते, अधिकारी, कंत्राटी व आऊट सोर्सिंग कामगार यांच्या भावना संघटना पदाधिकारी यांनी विस्तृतपणे मांडून त्यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी विनंती केली. ऊर्जामंत्री यांनी ऐकून घेतल्यानंतर कोणत्याही ठोस निर्णय जाहीर केलेला नाही, त्यामुळे संघटना प्रतिनिधी यांनी कामबंद आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. आज पाच 5 दिवस होऊन अद्याप पण मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्याने आज 28 मे पासून कृती समितीने कार्यालयीन WhatsApp ग्रुप मध्ये लेफ्ट होत, आंदोलन तीव्र केले आहे, असे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन सबोंडीनेट इंजिनीअर्स असोसिएशन विदयुत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियन, महाराष्ट्र विज कामगार महासंघ.( बी एम. एस. ), महाराष्ट्र राज्य विज कामगार कांग्रेस. (इंटक) हाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार यूनियन. यांच्या वातीन ऐका प्रसि्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.