जळगाव प्रतिनिधी । घरासमोर पत्ते खेळणे, गाडी लावणे बाबत हटकले असता राग आल्याने तिघांनी एकाला लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, राजू भगवान देशमुख (वय-४२) रा. श्याम नगर गिरणा पंपींग रोड जळगाव हे कुटुंबियांसह राहतात. त्यांच्या घरासमोर काही मंडळी पत्ते खेळणे, गाडी लावणे, लघवी करून जाणे हा प्रकार होत होता. काल बुधवारी २६ मे रोजी सकाळी ११ वाजता अश्याच गोष्टींवरून राजू देशमुख यांनी हटकले असता रागातून दत्तू कोळी, विक्की कोळी, भारत संजय सपकाळे रा. श्याम नगर, गिरणा पंपिंग रोड जळगाव यांनी राजू देशमुख यांना शिवीगाळ दमदाटी करून लोखंडी रॉड पाठीत मारले तर डोक्यावर धारदार वस्तू आणि बाटली फोडली. यात देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास देशमुख यांच्या फिर्यादीवरून तिघांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिवाजी धुमाळ करीत आहे.