भगवान गौतम बुध्द जयंतीनिमित्त पुतळ्याला महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते माल्यार्पण

जळगाव प्रतिनिधी । तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या जयंतनिमित्त दिक्षितवाडी येथील भगवान गौतम बुध्द आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते आज बुधवारी सकाळी १० वाजता माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

रिपाईचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी साऱ्या जगाला शांती, अहिंसा व करुणेचे मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी बुध्द वंदना घेण्यात आली. यावेळी जे.डी.भालेराव, प्रताप बनसोडे, प्रविण परदेशी, किरण अडकमोल, सिध्दार्थ गवाणे, अजीज शेख, संतोष सोनवणे, सागर पवार, मिलींद सोनवणे, सागर सपकाळे आदींची उपस्थिती होती.

 

Protected Content