Home Cities धरणगाव भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्षपदी संजय महाजन

भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्षपदी संजय महाजन

0
114
sanjay mahajan

धरणगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेल जिल्हाध्यक्षपदी येथील संजय महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

धरणगावचे माजी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. संजय महाजन यांची ओबीसी सेल तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती निमित्ती त्यांचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, संघटन मंत्री रवी अनासपुरे, अ‍ॅड. किशोर काळकर, ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, प्रदेश उपाध्यक्ष स्मिता पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदू पटेल यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी कौतुक केले आहे.

संजय महाजन यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. यात ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, उपाध्यक्ष पी. सी. पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, शिरीष बयस, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, हरिष डेडिया, टोनी महाजन, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, ज्ञानेश्‍वर महाजन, विशाल अमृतकर यांनी त्यांचे अभिनंदन करत आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound