बुलडाणा : प्रतिनिधी । जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, कृषी निगडित दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे.
कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १ जून २०२१ पर्यंत सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आदेशात अंशत : बदल करण्यात आला आहे.
या वेळे व्यतिरिक्त सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तू दुकाने, किराणा,स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने यांना घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकाळी ७ ते सायं ७ पर्यंत मुभा देण्यात येत आहे. दूध व दुग्ध जन्य पदार्थ विक्री सकाळी ६ ते सकाळी ९ आणि सायं ६ ते रात्री ८ सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. घरपोच दूध विक्री नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष एस. रामामुर्ती यांनी दिले आहेत.