Home क्राईम सुप्रिम कॉलनीत एकाला कारण नसतांना शिवीगाळ व मारहाण

सुप्रिम कॉलनीत एकाला कारण नसतांना शिवीगाळ व मारहाण

0
104
maramari 1


जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात राहणाऱ्या भाजीपाला विक्रेत्याला काहीही कारण नसतांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, फकिरा प्रकाश बिऱ्हाडे (वय-३०) रा. सुप्रीम कॉलनी, रामदेव बाबा मंदीराजवळ हे आपल्या परिसरासह राहतात. भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. २० मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुप्रीम कॉलनीतील सार्वजनिक शौचालयात शौचालयाला बसला असता येथील रहिवाशी सोन्या (पुर्ण नाव माहित नाही) याने काहीही कारण नसतांना शिवीगाळ केली. याची विचारणा केली असता राग आल्या सोन्याने दगड फेकून मारला. तर फकीराच्या पत्नीला शिवीगाळ देखील केली. फकिरा बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून सोन्या विरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound