Home क्राईम गावठी कट्टा, तीन काडतुसे घेवून फिरणाऱ्यास अटक; शहर पोलिसांची कारवाई (व्हिडिओ)

गावठी कट्टा, तीन काडतुसे घेवून फिरणाऱ्यास अटक; शहर पोलिसांची कारवाई (व्हिडिओ)


जळगाव प्रतिनिधी । शहरातील बिग बाजार परिसरात पार्किंग येथे गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

बिग बाजार परिसरातील पार्किंग परिसरात सद्दाम उर्फ युनूस सलीम पटेल ( रा.गेंदालाल मिल ) गावठी कट्टयासह तीन जीवंत काडतुसे घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अक्रम शेख आणि भास्कर ठाकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्रम शेख, विजय निकुंभ, अक्रम शेख, उमेश भांडारकर, गणेश पाटील, रतन गीते यांनी कारवाई करत सद्दाम पटेल याला अटक केले. त्याच्या ताब्यातील एक गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे हस्तगत केले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/280288833806175


Protected Content

Play sound