फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील एका धार्मिक क्षेत्रातील विवाहीत व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याला चोप देऊन फैजपूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, फैजपूर येथील धार्मिक क्षेत्रातील एका विवाहीत व्यक्तीने आज एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. या मुलीच्या आजोबाच्या दुचाकीच्या विक्रीबाबत हा माणूस गेला असता त्याने मुलीचा विनयभंग केला. तिने तात्काळ याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर त्याला चोप देऊन पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. या अनुषंगाने संबंधीत अल्पवयीन मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून त्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नियमानुसार महिला पोलीस अधिकार्याच्या उपस्थितीत गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याने याला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, धार्मिक क्षेत्राशी संबंधीत असणार्या या व्यक्तीबाबत आधीदेखील असे प्रकार घडले आहेत. मात्र लोकांनी मध्यस्थी केल्यामुळे प्रकरण विकोपाला गेले नाही. मात्र आजच्या प्रकाराने तो गोत्यात आला असून आता त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.