राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे इंधन दरवाढीचा निषेध (व्हिडिओ)

 जळगाव, प्रतिनिधी  । राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जळगाव जिल्हाच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ केल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्रहाकांचा गुलाबाचे फुल देउन सत्कार करून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्य वतीने  केंद्र सरकारने केलेली  खतांची व पेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.  यामागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी  पेट्रोल पंपावर लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला देखील गुलाब पुष्प देण्यात आले.  याप्रसंगी प्रदेश सचिव संदीप पाटील, जिल्हा सरचिटणीस अनिल खडसे, सरचिटणीस सुशील शिंदे, धवल पाटील, अमोल कोल्हे,विधानसभा क्षेत्र प्रमुख रॉकि पाटील,किशोर सूर्यवंशी,हर्षल वाघ, भूषण पवार,योगेश नरोटे,राजु शेख आदि मंडळी उपस्थित होती. 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1393472077673108

 

Protected Content