Home धर्म-समाज अ. भा. मीणा समाज राज्य युवक अध्यक्षपदी कैलास टाटू

अ. भा. मीणा समाज राज्य युवक अध्यक्षपदी कैलास टाटू

0
28

पाचोरा प्रतिनिधी । अखील भारतीय मीणा समाज राज्य युवक अध्यक्षपदी येथील कैलास टाटू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की,अखिल भारतीय मीणा समाज महासभा या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश जोनवाळ यांच्या आदेशानुसार युवक कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात कैलास टाटू यांची अखिल भारतीय मीणा समाज महासभा संघटनेच्या राज्य युवक अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मीणा समाज महासभा संघठन मजबूत करण्यासाठी कैलास टाटू यांच्या नेतृत्वाचा अनुभव व मार्गदर्शनाचा सर्व जिल्ह्यातील गावा – गावात शाखा सुरू करण्या करिता योग्य उपयोग होईल. त्यांच्या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष नाहरसिंग सत्तांवन, मोहरसिंग सलावद, डॉ. किरोडी लाल मीणा, प्रदेश अध्यक्ष रमेश जोनवाळ, सुभाष डोभालराम उसारे, दिपक डोभाळ, गोकुळ चेडवाळ, गोपाल चन्नावत यांनी अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला. कैलास टाटू यांच्या निवडीबद्दल सर्वत्र समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound