नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आता कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पद्धती परिणामकारक न ठरत नसल्याने वैद्यकीय व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्त्वांमधून वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोरोनाच्या संसर्ग झाल्यानंतर गंभीर असलेल्या रुग्णांसाठी प्लाझ्मा उपचार पद्धती परिणामकारक ठरत असावी म्हणून आधी आयसीएमआर आणि इतर केंद्रीय वैद्यकीय संस्थांनी परवानगी दिली होती. काही दिवसांपूर्वी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या अतार्किक वापरावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
शुक्रवारी आयसीएमआर-नॅशनल टास्क फोर्सच्या बैठकीत, सर्व सदस्यांनी प्रौढ रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पद्धतीचा अतार्किक वापरामुळे उपयोग होत नसल्याने या उपचार पद्धतीचा वापर थांबण्याला अनुकूलता दर्शविली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) लवकरच मार्गदर्शक सूचना जाहीर करणार असल्याचे सांगितले. सध्याच्या निकषांनुसार, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा पद्धतीचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या अतार्किक वापरावर प्रश्न उपस्थित केले होते. केंद्रीय वैद्यकीय सल्लागार डॉ. विजय राघवन यांच्यासह भारतीय वैद्यकीय आयसीएमआर आणि दिल्लीतील एम्स संचालकांना यासंदर्भात पत्र लिहिले होते.
“भारतात प्लाझ्माचा अवैज्ञानिकपणे आणि अतार्किकपणे वापर केला जात आहे. प्लाझ्मासंदर्भात करण्यात आलेल्या ताज्या संशोधनात आढळून आलेल्या पुराव्यानुसार प्लाझ्मा उचपार पद्धतीचा रुग्णावर कोणताही चांगला परिणाम होत नसल्याचं दिसून आलं आहे. तरीही भारतभरातील रुग्णालयांमध्ये रुग्णांवर प्लाझ्मा उपचार केले जात आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांचे प्लाझ्मा दात्यांचा शोध घेताना फरफट होत आहे,” असं या पत्रात म्हटले होते.
“सध्या केल्या जात असलेल्या प्लाझ्मा उपचार पद्धतीमुळे कोरोनाचा अति घातक विषाणू तयार होण्याची शक्यता आहे. असा विषाणू निर्माण झाल्यास सध्याच्या महामारीच्या काळात तो पेट्रोल ओतण्यासारखाच ठरेल,” असा इशारा या तज्ज्ञांनी दिला होता.
११ हजार ५८८ रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पद्धतीचा कोणताही उपयोग झाला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अर्जेटिना मधील प्लाझ्मा उपचार पद्धतीवर केलेल्या निष्कर्षात प्लाझ्मा उपचार पद्धतीमुळे दैनंदिन रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूदरात कोणताही फरक नसल्याचे सांगितले आहे.