Home Cities भुसावळ राज्य स्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी भुसावळच्या तीन खेळाडूंची निवड

राज्य स्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी भुसावळच्या तीन खेळाडूंची निवड


02499395 8ebc 43ce 9ec2 7c1d9d23ee53

जळगाव (प्रतिनिधी) ज्युनिअर गर्ल्स (१७ वर्षाखालील) राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा फुटबॉल असो. तर्फे भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या
कृषा विनोद बुला, शीतल सुरेश सहानी, वैष्णवी राकेश कोष्टी यांची निवड करण्यात आली आहे.

 

मुंबई येथे ६ एप्रिलपासून पूर्वतयारी कॅम्प होणार असून अंतिम संघाची निवड होवून १० एप्रिलपासून कोल्हापूर येथे सुरु होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्या जाणार आहेत. त्यांना आज फुटबॉल असो. चे सचिव फारूक शेख, जैन स्पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे व प्रशिक्षक अब्दुल मोहसीन यांनी शुभेच्छा दिल्या. क्रीडाशिक्षक संधिया बंसोड, इम्तियाज शेख, प्रा.डॉ अनिता कोल्हे, जफर शेख, ताहेर शेख, शेखर देशमुख, नित्यानंद पाटील यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound