Home Cities जामनेर शेदुर्णी येथे तेली समाजाचे मार्गदर्शक स्व. आर.टी. चौधरी यांना श्रध्दांजली

शेदुर्णी येथे तेली समाजाचे मार्गदर्शक स्व. आर.टी. चौधरी यांना श्रध्दांजली

0
31


शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) । तेली समाजाचे उत्तर महाराष्ट्रातील मार्गदर्शक व आधारस्तंभ तैलिक महासभेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष स्व. आर. टी. अण्णा चौधरी यांना आज शेंदुर्णी तेली समाज मंडळाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

गावातील कडोजी महाराज मंदीराच्या सभागृहात कोव्हीड नियमांचे पालन करून शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आर.टी.अण्णांच्या कार्याची माहिती देण्यात येऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच मार्गक्रमण करून समाजाचा विकास केला तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे यावेळी सांगण्यात आले. शोकसभेमध्ये येथिल मंडळाचे अध्यक्ष भागवत रामदास चौधरी, राजेंद्र लक्ष्मण पवार, भानुदास चौधरी, श्रीकृष्ण चौधरी, गणेश नामदेव चौधरी यांसह इतर समाज बांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound