भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रंगोली हॉटेल जवळील पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने परिसरातील जनता 16 दिवसापासून पाण्यापासून वंचित आहे. नगरपालिका प्रशासनाने पाईपलाईन त्वरीत दुरूस्त करावी अशी मागणी स्थानिक नागरीकांनी केली आहे.
जनता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अधिच नागरीक त्रस्त झाले असून त्यात रंगोली हॉटेल जवळील मुख्य पाईपलाईन फुटल्याने परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी १६ दिवसापासून वणवण फिरण्याची वेळ नगरपालिका प्रशासनाने आणली आहे. ही पाईपलाईन फुटल्याने आनंद नगर, कस्तुरी नगर, नेब कॉलनी, बिजली कॉलनी ह्या भागातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी वंचित आहे. परिसरातील नागरिकांनी पाणी सोडणारे नगरपालिकाचे कर्मचारी यांना पाण्यासाठी फोन लावला असता कर्मचारी फोन उचलत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संताप दिसत आहे. अशा कर्मचाऱ्यांची तडकाफडकी वॉर्डातून बदली करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.