Home क्राईम एमआयडीसी हद्दीत दोन ठिकाणी दुचाकींची चोरी; एमआयडीसी पोलीसात चोरट्यांवर गुन्हा

एमआयडीसी हद्दीत दोन ठिकाणी दुचाकींची चोरी; एमआयडीसी पोलीसात चोरट्यांवर गुन्हा

two wheelar thift

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस हद्दतील तालुक्यातील खेडी गावातील इंदीरा नगर आणि हॉटेल त्रिमुर्ती जवळील पिपल्स बँकेसमोर या दोन ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. एमआयडीसी पोलीसात  अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, पहिल्या घटनेत प्रविण शालीक कोळी (वय-४२) रा. इंदीरा नगर खेडी. ता.जि.जळगाव यांच्या घरासमोर दुचाकी (एमएच १९ सीडी ८३५४) पार्किंगला ९ मे रोजी रात्री १०.३० वाजता लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याचे १० मे रोजी सकाळी सात वाजता उघडकीला आले. तर दुसऱ्या घटनेत  पवन रमेश कोळी (वय-३०) रा. कुसुंबा साईराम चौक हे बँकेच्या कामानिमित्त सोमवारी १० मे रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जळगाव औरंगाबाद रोडवील जळगाव पिपल्स बँकेत दुचाकी (एमएच १९ बीए ७०३८) ने आले. बँकेच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी दुचाकी पार्किंगला लावली. १५ मिनीटात बँकेचे काम आटोपून पवन कोळी घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आले. त्यांना दुचाकी जागेवर आढळून आली नाही. परिसरात शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही. दोन्ही घटनेबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील आणि पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे. 


Protected Content

Play sound