आज ८४४ बाधीत रूग्ण; ८२२ पेशंटनी केली कोरोनावर मात

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग अल्प प्रमाणात का होईना थोडा कमी झाला असून आज ८४४ कोरोना बाधीत पेशंट आढळून आले असून ८२२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज चिंताजनक बाब म्हणजे चोपडा, भुसावळात, चाळीसगाव व एरंडोलमध्ये वाढीस लागलेला संसर्ग होय !

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या ही बाराशेच्या आत होती. तर आता हा आकडा काहीसा कमी झाल्याचे दिसून आले आहे. आता नऊशेच्या आत रूग्ण आढळून येत आहेत. आज दिवसभरात पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही पुन्हा एकदा नऊशेच्या आत म्हणजेच ८४४ इतकी झाली आहे. तर गत चोवीस तासांमध्ये ८२२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज दिवसभरात जिल्ह्यात १२ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या रूग्णसंख्येचा विचार केला असता पुढील प्रमाणे रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर-६१; जळगाव ग्रामीण-१६; भुसावळ-१३२; अमळनेर-१२; चोपडा-१५०; पाचोरा-२०; भडगाव-१५; धरणगाव-६०; यावल-२३; एरंडोल-७४; जामनेर-४७; रावेर-२६; पारोळा-०३; चाळीसगाव-९४; मुक्ताईनगर-५२; बोदवड-४९ आणि इतर जिल्ह्यांमधील १० असे रूग्ण आढळून आले आहेत.

Protected Content