Home क्राईम यावल शहरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता, पोलिसात नोंद

यावल शहरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता, पोलिसात नोंद


यावल, प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर भागामध्ये राहणारी २१ वर्षीय तरुणी हि अचानक घरातून निघून गेल्याची घटना आज १० रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी तरुणीच्या आईच्या फिर्यादीवरून मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद यावल पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. 

 

अधिक माहिती अशी की,  तरूणीची आई सुनंदा मधुकर वाघ, (वय ४२) हिने यावल पोलीसात दिलेल्या खबरेवरून माझी मुलगी लक्ष्मी उर्फ गायत्री मधुकर वाघ (वय २१) रा. शिवाजीनगर, यावल ही दि. १o मे रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने लाईट बंद असल्याने मला जाग आली असता, बघीतल्यावर ती त्याच्या जागेवर झोपलेली मिळुन आली नाही. म्हणुन आम्ही तीस प्रथम घरातील शौचालय व आधी ठीकाणी शोधाशोध घेतली असता ती मिळुन आली नाही. अखेर ती कुणाला काहीही एक न सांगता घरातुन निघुन गेल्याचे दिसुन आले असुन, याबाबत सुनंदा वाघ यांनी पोलीसात खबर दिल्याने लक्ष्मी उर्फ गायत्री वाघ ही २१ वर्षीय रंग सावळा, शरीर सळपातळ चेहरा गोल, नाक सरळ जाड, केस काळे, डोळे काळे, तिने काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व पिवळ्या रंगाची पँट वयाच रंगाची ओढणी परिधान केली असुन याबाबत ती हरवल्याची नोंद करण्यात आली असुन सदरची मुलगीही कुणास मिळुन आल्यास किंवा दिसुन आल्यास यावल जिल्हा जळगाव पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .


Protected Content

Play sound