Home धर्म-समाज बनावट रेमडेसिवीर बनविणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : जितेंद्र जैन

बनावट रेमडेसिवीर बनविणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : जितेंद्र जैन

0
22


पाचोरा, प्रतिनिधी  । देशात कोरोना महामारीने थैमान घातले असतांना काही व्यक्ती पैसे कमविण्यासाठी बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन  विक्री करतांना दिसून येत आहेत. अशा महाभागांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिव सेना पदाधिकारी जितेंद्र जैन यांनी केली आहे. 

आज कोरोना या  महामारीमध्ये संपुर्ण मानव जाती यातून बाहेर निघण्यासाठी धडपडतेय. आरोग्य यंत्रणा  – प्रशासन जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवण्यासाठी दिवस रात्र काम करताय. अशा या देशावरील संकटात काही लोक फक्त पैसाच सर्वस्वी या राक्षसी स्वभावाने बनावट रेमडेसिवीर बनवून त्याची देशभर विक्री करतांना आढळत आहेत. जसे अतिरेकी लोकांच्या जीव जावा म्हणून बॉम्ब टाकतात त्याच प्रकारे लोकांच्या जीवाशी या प्रकारे खेळणे हे सुद्धा अतिरेकी कार्य आहे. म्हणुनच हा एक प्रकारे देशद्रोहच आहे. आजपर्यंत या बनावट इंजेक्शनामुळे किती निरपराध लोक आपला जीव गमावून बसले असतील. जे कोणी अशा प्रकारचा काळाबाजार करत असतील अशांना अटक करून त्यांची सखोल चौकशीकरावी.  जे जे यात सहभागी असतील त्या सर्व्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा. असे आतंकवादी प्रवृत्तीचे समाजकंटक सुटता कामा नये. अशी मागणी जितेंद्र जैन यांनी केली आहे.


Protected Content

Play sound