जळगाव प्रतिनिधी । शहरातील कंजरवाडा परिसरातील बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्यांवर एमआयडीसी पोलीसांनी बुधवारी सकाळी छापा टाकून १ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे दारू बनविण्याचे रसायन नष्ट करण्यात आली. एमआयडीसी पोलीसात ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील कंजरवाडा परिसरात बेकायदेशीर गावठी हात भट्टीची दारू तयार होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार आज बुधवार ५ मे रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास एमआयडीसीचे सपोनि अमोल मोरे, पोउनि विशाल वाठोरे, रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, तुकाराम निंबाळकर, राजेंद्र सैंदाणे, गणेश शिरसाळे, सिद्धेश्वर लटपटे, नामदेव पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, साईनाथ मुंढे, सचिन पाटील, महिला पोलिस नाईक निलोफर सैय्यद, राजश्री बाविस्कर, आशा पांचाळ यांनी कारवाई करत सुमारे १ लाख ३२ हजार ५०० रूपये किमतीचे दारू बनविण्याचे कच्चे व पक्के रसायन नष्ट केले. यात बेबीबाई भारत बाटुंगे (46 रा. तांबापुरा), प्रेमाबाई गजमल कंजर (वय-51 रा. जाखनी नगर) नीलमबाई गोपाळ बाटुंगे (वय-30 रा. तांबापुरा खदान), मुन्नीबाई देविदास बागडे (वय-40 तांबापुरा खदान) यांच्या कब्जातून जवळपास साठ हजारांचे कच्चे रसायन जप्त करुन नष्ट करण्यात आले. चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.