Home क्राईम चांगदेव शिवारातून तुरीच्या गोण्यांची चोरी; मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा

चांगदेव शिवारातून तुरीच्या गोण्यांची चोरी; मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा


मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील चांगदेव येथील शेतकऱ्याच्या शेतातून तुरीच्या १८ गोण्या असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की,  सूरज अशोक निळे (वय-२३, रा.चांगदेव ता.मुक्ताईनगर) यांनी तालुक्यातील चांगदेव शिवारातील शेत गट क्रमांक ४०७ मधील शेतातील गोडावूनचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ मे सकाळी ७ ते २ मे सकाळी ८ वाजेच्या दरम्यान तुरीच्या १८ गोण्या असा एकुण ७३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविला. परिसरात चोरीची माहिती न मिळाली नाही. याप्रकरणी मुक्तानगर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक संदीप खंडारे करीत आहे.


Protected Content

Play sound