यावल प्रतिनिधी । प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासीम अंतर्गत तालुक्यातील कोळवद आरोग्य वर्धीनी केंद्रात कोवीड लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे.
ग्रामीण पातळीवर कोरोनाचा संसर्गा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य यंत्रणाही अधिक सर्तक व सज्ज झाली आहे. या कार्यक्रमाला जि.प. सदस्या सविता भालेराव, सरपंच याकुब तडवी, उपसरपंच शशिकांत चौधरी, सामाजीक कार्यकर्ते अतुल भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी, ग्रा.पं.सदस्य अनिल पाटील, विठ्ठल सूर्यवंशी, फत्तू तडवी आदि उपस्थित होते.
प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी, डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही लसीकरण मोहीम तालुक्यातील विविध आरोग्य उपकेन्द्रांवर राबवण्यात आली. यावेळी ४५ वर्षावरील ३० नागरिकांना कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. कोळवद व सातोद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.साजिद तडवी , डॉ.राहुल गजरे ,आरोग्यसेविका मेहमूदा तडवी, आरोग्यसेवक भुषण पाटील, आशा सेविका छाया वाघुळदे ,उषा कोळी ,सरला गुंजाळ व सायरा तडवी यांनी यशस्वीरित्या नियोजन करून कोवीड लसीकरण कार्यक्रम राबविला जात आहे.