जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको भागातील ११ वर्षाच्या बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली असून तिचा मृतदेह काढून तपासणी करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा हुडको येथे ११ वर्षाची मुलगी ही आपल्या आई-वडिलांसह वास्तव्याला होती. या मुलीचा २३ एप्रिल रोजी आकस्मीक मृत्यू झाला. तिच्या पालकांनी कुणालाही माहिती न देता तिच्या पार्थिवाचे दफन केले.
दरम्यान, आपल्या नातीचे अचानक मृत्यू झाल्याची माहिती तिचे आजोबा (आईचे वडील) व मामा यांना मिळाली. त्यांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली. पोलिसांनी तिच्या आई व वडिलांची चौकशी केली असता त्यांना विसंगती आढळून आली. यामुळे आता त्या मुलीचा मृतदेह उकरून काढून तिच्या शरीरावर घातपाताच्या काही खुणा आहेत का ? याची तपासणी करण्यात येणार आहे.
आज दुपारी या संदर्भात रामानंदनगर पोलीस स्थानकात मुलीचे आई-वडील व इतर दोन जणांची कसून चौकशी सुरू आहे.