जळगाव प्रतिनिधी । भगवान महावीर जयंती दिनी मांस विक्रीस बंदी असतांना दुकाने उघडी ठेवून मांस विक्रेत्यांवर जिल्हा पेठ पोलीसांनी कारवाई करत नऊ विक्रेत्यांवर कारवाई करत प्रत्येकी २ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शासकीय नियमाप्रमाणे भगवान महावीर जयंतीदिनी राज्यात मांस विक्री करण्यास बंदी करण्यात आली आहे. असे असतांना आज भास्कर मार्केट परिसरातील एकुण ९ दुकानांवर चिकन व मटन विक्रेत्यांनी दुकाने उघडी ठेवून मांस विक्री सुरू केली होती. मांस विक्री होत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलीसांनी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास कारवाई करत नऊ विक्रत्यांवर कारवाई केली. यात अपना चिकन दुकानाचे मालक इमरान सजाद खाटीक, ए वन चिकन सेटरचे अजिज भिक खाटीक, अमोल चिकनचे दुकानाचे शेख खलील शेख याकुब , भवानी चिकन दुकानाचे गोपाल दगडू राऊळकर, हसनियन चिकन दुकानचे इश्वर दगडू राऊळकर अलिशा चिकन दुकानाचे बाबु उस्मान खाटीक, सातपुडा चिकन दुकानाचे सईद दादामिया खाटील, दंगलग्रस्त कॉलनीतील मटन दुकान असीफ अजिज खाटील आणि जाकीर असलम खाटील अश्या ९ जणांवर जिल्हा पेठ पोलीसांनी कारवाई करत प्रत्येकी २ हजार रूपये दंड वसूल केला आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/213936513453946