जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील गुरांच्या बाजार मार्केटसमोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीला आज दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली होती. महापालिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग विझविली असून पुढील अनर्थ टळला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव एमायडिसी हत्येतील गुरांच्या बाजारासमोरील असलेल्या इलेक्ट्रिक डीपीला आज रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोहेकॉ गफुर तडवी यांनी तातडीने अग्निशमन विभागाच्या कार्यालयात फोन लावून आगीची माहिती दिली. तसेच महावितरणच्या कार्यालयात देखील फोनद्वारे कळविले. दरम्यान काही मिनिटाच्या आत अग्निशमन विभागाचे अग्निशमन बंब घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन ही आग विझवण्यात आली आहे. दरम्यान सायंकाळपर्यंत गीबाबत पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोहेकॉ गफुर तडवी. पोलीस नाईक सुधीर साळवे यांनी यासाठी परिश्रम घेतले.