यावल, प्रातिनिधी । वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीणस्तरावर होम क्वारंटाइन करण्यात आलेले रुग्ण सार्वजनिक ठिकाणी खुलेआम फिरतांना दिसत असून हा प्रकार थांबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारून गाव पातळीवर दक्षता घेण्याची आवश्यकता खासदार रक्षाताई खडसे बैठकीत व्यक्त केली. त्या तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात यावल ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर उभारणी संदर्भातील आढावा बैठकीत बोलत होत्या.
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण पातळीवर मोठया प्रमाणावर कोरोना बाधीत रुग्ण हे होम क्वारंटाइनच्या नांवाखाली गावागावात सार्वजनिक ठिकाणी खुलेआम फिरतांना दिसुन येत असल्याच्या तक्रारी आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातुन एक यंत्रणा उभारून कोरोनाच्या उच्चाटन करण्यासाठी व या सर्व प्रकारास थांबविण्यासाठी गाव पातळीवर दक्षता घेणे अत्यंत गरजे असल्याच्या सूचना आरोग्य व पंचायत प्रशासनास खासदार रक्षाताई खडसे यांनी केल्यात.
आढावा बैठकीत खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह जळगावचे आमदार तथा भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भोळे, जळगाव जिल्हा परिषदच्या अध्यक्ष रंजना पाटील , जिल्हा परिषदचे आरोग्य सभापती रविन्द्र ( छोटु ) पाटील , पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी , जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव , तहसीलदार महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार , तालुका प्रभारी आरोग्य अधिकारी मनिषा महाजन , यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला , गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील आदी उपस्थित होते.
तालुक्यात सातत्याने कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यावल येथे ग्रामीण रुग्णालयात ५० बेडचे ऑक्सीजन कोवीड सेन्टर तात्काळ उभारणीच्या कार्यास वेग आला आहे. या संदर्भात स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीची भूमिका जाणुन घेण्यासाठी आज तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कोवीड सेन्टर उभारणीनंतर येणाऱ्या वैद्यकीय व तांत्रीक अडचणीवर तोडगा काढण्यासाठी उपस्थितांची मते जाणुन घेण्यात आली. यावेळी गावपातळीवर पंचायत समितीच्या माध्यमातुन कोरोनाबाधीत रुग्ण हे गाव फिरता कामा नये यासाठी खबरदारी म्हणुन गावात किमान दोन वेडा दंवडी दिली जाणे गरजे असल्याचे खा. रक्षाताई खडसे यांनी स्पष्ट करून गावातील सरपंच, उपसरपंच , तलाठी , पोलीस पाटील यांची एक यंत्रणा उभारण्याची सूचना त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्यात. बैठकीस भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , माजी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती हर्षल गोवींदा पाटील, पंचायत समिती सदस्य दिपक अण्णा पाटील , भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पुरूजीत चौधरी , भाजपाचे विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत यांच्यासह आदी पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.