पाचोरा, प्रतिनिधी ! राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराची सुरुवात प्रभु श्रीराम प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने रक्ताचा तुटवडा भासल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने रक्तदान शिबीर राज्यामध्ये आयोजित केले जात आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार मनीष जैन, डॉ. बाळू जैन, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, सरपंच अशोक चौधरी, माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. या रक्तदान शिबिरात कोरोनाच्या कठीण काळात देखील तरुणांचा प्रचंड उत्साह दिसून आला.
. शुभम पाटील, शेख मोहसीन , निवृत्ती उशीर, प्रमोद चौधरी, सागर चौधरी, दिलीप मोरे, चारुदत्त सावंत, राकेश काळे, आकाश पाटील, दिपक जोहरे, कल्पेश चौधरी, शेख मतीन, शुभम पाटील, विशाल आहिरे, महेंद्रा तेली, ज्ञानेश्वर चौधरी, दिलीप मोरे, प्रमोद चौधरी, महादेव पाटील, गणेश गोने, योगेश उभकर, प्रल्हाद वाघ, वायरमन अमोल घोडके यांनी रक्तदान देऊन योगदान दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कैलास चौधरी, रमेश तेली, संजय चौधरी, मोबीन शेख, प्रकाश वाघ, संतोष बोखारे, प्रकाश देशमुख, नाना पाटील, डॉ. पृथ्वीराज पाटील, दिलीप पाटील, रवींद्र पाटील, समाधान देवरे, हिरामण पाटील, गोविंदा निकम, यशोदीप चौधरी, शुभम चौधरी, गणेश पांडव, राहुल पाटील, प्रकाश देशमुख, राजेश माळी, उद्धव माळी, बबलू पैलवान, सुभाष चौधरी, देवीदास वाघ, बाळू सावंत, माधव पाटील यांनी आणि रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांच्या टीमने सहकार्य केले. माणुसकी ग्रुप सदस्य, नारायण देवबाबा चौधरी पतसंस्था कर्मचारी व कळमसरा ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.