बेवारस १८२ वाहनांचा पोलीस खात्याकडून लिलाव (व्हिडिओ)

 

जळगाव, राहूल शिरसाळे   । गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस असलेल्या १८२ वाहनांचा एमआयडीसी  पोलीस स्टेशन येथे लिलाव करण्यात आला.

जिल्ह्यात तीन महिन्यांपासून बेवारस वाहनांची निर्गंतीची प्रक्रिया पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने राबविण्यात येत आहे. बेवारस वाहनांच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये संबंधित वाहनाचे नंबर आणि चेसीस  क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले होते.  या  वाहनांचे मालक आरटीओकडून माहिती घेऊन शोधले  जातात.  माहिती उपलब्ध झाल्यावर त्या बेवारस वाहनांच्या मालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या मालकांचा शोध लागला नाही किंवा पत्ते मिळूनही ते मिळाले नाहीत अशा वाहनांचा लिलाव करण्यात आला.  

 काही गाड्या इतक्या खराब झाल्या होत्या की आरटीओकडूनदेखील  इंजिन नंबर,  चेसीस नंबर मिळू शकला नाही अशा वाहनांचे लिलाव करण्याची प्रक्रिया मागील तीन महिन्यांपासून पार पाडण्यात येत आहे. आज एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या आवारात जळगाव शहरातील  ६ पोलीस स्टेशन मधील १८२ वाहनांचा लिलाव करून  ७ लाख ५९ हजार मिळालेली रक्कम शासन जमा करण्यात येणार आहे. 

आज जळगाव शहरातील  ६ पोलीस स्टेशन मधील वाहनांचा लिलाव प्रक्रिया संपली असून  जिल्ह्यातील २९ पोलीस स्टेशन मध्ये देखील ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात पोलीस स्टेशनमध्ये वर्षानुवर्षे पडून असलेल्या ७५० वाहनांची यादी तयार करण्यात आली होती. यामुळे संबधित पोलीस स्टेशनची जागा  व्यापली होती. जुन्या वाहनांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे  आरोग्य  खराब होत होते.  या वाहनांमुळे स्वच्छता ठेवणे अवघड झाल्यने ही पारदर्शक पद्धतीने लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली.   ट्रक, कार व रिक्षा यांचा समावेश होता, यात जास्तीत जास्त मोटर सायकली होत्या अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

दरम्यान, लिलावात सहभाग घेण्यासाठी येणाऱ्या काही नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागल्याने त्यांनी याबाबत खेद व्यक्त केला.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/969509103854877

 

Protected Content